Sunday, January 30, 2022

Indira Gandhi National Old Age Pension Scheme in Marathi | full details |

जशे तुम्हाला माहीतच आहे वृद्ध लोकांना जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ(old age) निवृत्ती वेतन योजना सुरू केली. या योजने मध्ये वृद्ध पुरुष व स्त्रीना मदत होणार आहे आणि विधवे महिला आणि अपंग नागरिक सुद्धा लाभ गेवूशकता.

  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय पाहूया :-

  भारताच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने 2007 मध्ये राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (NSAP) अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (IGNOAPS) सुरू केली आहे. या योजनेला 65 व 65 वर्षावरील सर्व वृद्ध व्यक्ती पात्र होतील.
  या योजने अंतर्गत राज्य शासनाकडून 400/- रुपये प्रतिमहिन्याला व केंद्र शासनाकडून 200/- रुपये प्रतिमहिन्याला असे एकूण 600/- रुपये प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन मिळते. आजच्या काळातही आपल्या देशात असे अनेक नागरिक आहेत ज्यांची आर्थिक स्थिती दुर्भळ आहे. अशा सर्व कुटुंबांना महाराष्ट्र शासनाकडून विविध योजनांद्वारे आर्थिक लाभ दिला जातो. जेणेकरून त्याना मदत होईल. वृद्ध, विधवा महिला आणि अपंग नागरिक इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा मदत घेऊ शकतात. या योजनेचा लाभ फक्त बीपीएल कुटुंबांनाच दिला जातो.


  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे ठळक मुद्दे :-

  योजना योजना बदल माहिती
  योजनेचा नाव इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळनिवृत्ती वेतन योजना
  लाभार्थी श्रेणी सर्व श्रेणी
  योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थीला दरमहा 600 रुपये दिले जातात.
  योजनेचा सुरुवात कोणी केली केंद्र सरकार
  अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीलदार/तलाठी यांना सादर केला जातो
  उद्देश्य पेन्शनद्वारे आर्थिक मदत
  योजनेचे लाभार्थी देशातील वृद्ध, विधवा महिला, अपंग व्यक्ती
  या कार्यालयाशी संपर्क साधा कलेक्टर कार्यालय/तहसीलदार/तलाठी कार्यालय

  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे फायदे(Benefits):-

  • डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पेन्शन येणार.
  • राज्यानुसार मासिक पेन्शन 600 रुपय ते 1000 परेंत मिळणार.
  • BPL कुटुंबातील 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र आहेत.
  • या योजने अंतर्गत राज्य शासनाकडून 400/- रुपये प्रतिमहिन्याला व केंद्र शासनाकडून 200/- रुपये प्रतिमहिन्याला असे एकूण 600/- रुपये प्रतिमहा मिळणार.

  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता निकष(eligibility):-

  • अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. (स्त्री/पुरुष)
  • अर्जदार हा बीपीएल (BPL) कार्ड धारण कुटुंबाचा असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार निराधार असणे आवश्यक आहे आणि त्याच्याकडे कुटुंबातील सदस्यांसाठी किंवा इतर कोणतेही स्रोत नसलेले आर्थिक सहाय्य नसणे आवश्यक आहे.
  • अर्जदार कोणत्याही रिअल इस्टेटचा मालक नसावा.

  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे आवश्यक कागदपत्रे(documents):-

  • हा योजने साठी केलेली अर्ज(form)
  • वयाचा पुरावा - (Age certificate)
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल(Income certificate issued by Talathi)
  • अर्जदाराच्या नावाचे दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कार्ड सादर करावे.
  • बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

  इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचा अर्ज प्रक्रिया(Apply):-

  • संबंधित क्षेत्रातील समाज कल्याण विभागाकडून अर्ज(Application form) मिळवा.
  • अर्जात दिलेली सर्व माहिती पूर्ण पाने भरा. खालील तसे :-
  1. राज्य/जिल्हा/ब्लॉक
  2. ग्रामपंचायतीचे नाव
  3. सोसायटीचे नाव
  4. लाभार्थीचे नाव
  5. वारसाचे नाव
  6. घर क्रमांक
  7. लिंग(MALE/FEMALE
  8. वर्षांमध्ये वय
  9. जन्मतारीख
  10. जन्म प्रमाणपत्र
  11. वार्षिक उत्पन्न आणि प्रमाणपत्र /BPL कार्ड
  12. अधिवास प्रमाणपत्र
  13. प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख
  14. EPIC क्रमांक
  • अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित तहसील समाज कल्याण अधिकार्‍यांकडे जमा करावा.
  • त्यानंतर अधिकाऱ्यांकडून तो अर्ज तपासला जाईल.
  • समाजकल्याण विभाग लाभार्थ्यांची शिफारस जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे करेल.
  • अंतिम मंजुरी जिल्हास्तरीय मंजुरी समिती (DLSC) द्वारे केली जाईल.
  Read Also:

  तुमच्या अर्जाचा ऑनलाइन कसा मागोवा घ्यावा(Track):-

  • ट्रॅक करण्या करीत NASP च्या होम पेजला भेट द्या.
  • त्या नांतर मुख्य पृष्ठावरील अधिक अहवालांवर क्लिक करा.
  • पुढील पृष्ठावरून ऍप्लिकेशन ट्रॅक पर्याय निवडा.
  • तुमचा अर्ज क्रमांक प्रविष्ट करा आणि शोध वर क्लिक करा.
  • अर्जाची स्थिती प्रदर्शित केली जाईल.

  Important Links:-

  अधिक माहिती साठी तलाठी ऑफिस किंवा ताशिलदार ऑफिस ला भेट करा.

  Indira Gandhi National Old Age Pension Scheme FAQ's :-

  • पेन्शन ची रक्कम कोणत्या पद्धतीने मिळणार ?
  निवृत्ती वेतनाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात जमा केली जाईल.
  • हा योजनेचा अंतर्गत किती रकमची मदत मिळणार?
  या योजने अंतर्गत राज्य शासनाकडून 400/- रुपये प्रतिमहिन्याला व केंद्र शासनाकडून 200/- रुपये प्रतिमहिन्याला असे एकूण 600/- रुपये प्रतिमहा मिळणार.
  • हा योजने साठी नागरिकांचे वय किती आहे?
  अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. (स्त्री व पुरुष).
  • हा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधावा?
  कलेक्टर कार्यालय तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयशी संपर्क साधू शकता.

  0 comments

  Post a Comment

  please do not enter any spam link in the comment box.